Skip to main content
GST Review April-2022

वर्क्स कॉन्ट्रॅक्ट संबंधात काही ठळक मुद्दे

Amit Lulla
वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत अनेक किचकट मुद्द्यांपैकी वर्क्स कॉन्ट्रॅक्ट हा एक बांधकाम व्यावसायिकांसाठी कटकटीचा विषय बनला आहे. एकमेका विरोधातील ॲडव्हान्स रुलिंग, शासनाने काढलेली विरोधाभास दर्शवणारी परिपत्रके यामुळे गोंधळात आणखीनच वाढ झालेली आहे. चर्चा सुरू करण्यापूर्वी काही संज्ञांची माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरेल. १) सीजीएसटी कायद्या अंतर्गत कलम २(११९) मध्ये असलेली वर्क्स कॉन्ट्रॅक्ट ची व्याख्या अतिशय व्यापक असून त्यात स्थावर मालमत्ते संबंधीत चौदा प्रकारच्या बांधकामांचा अंतर्भाव केला आहे. यात कोठे ना कोठे तरी बांधकाम व्यवसायिक बसतोच. वर्क्स कॉन्ट्रॅक्टमध्ये वस्तू आणि मजुरी या दोन्हीचा समावेश होतो. एक मुद्दा मात्र प्रकर्षाने ध्यानात ठेवला पाहिजे की जंगम मालमत्तेच्या बाबतीत वर्क्स कॉन्ट्रॅक्टची व्याख्या लागू होत नाही. २) बांधकाम हा शब्द वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या व्याख्येत समाविष्ट केलेला आहे. किरकोळ दुरुस्ती जरी असेल तरी त्याचा यामध्ये समावेश होतो. ३) वस्तूचा पुरवठा किंवा सेवेचा पुरवठा समजले जाणारे उपक्रम किंवा व्यवहार यासाठी दिलेल्या परिशिष्ट २ मधील अनुक्र.......