Skip to main content
GST Review December-2023

विकसन अधिकारांचे हस्तांतरण

Kishor Lulla
१) इतिहास-केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांना रस्ता रुंदीकरण, उद्याने, मैदाने अगर शाळा अशा सारख्या सुविधा पुरवण्यासाठी जागांची आवश्यकता असते. त्यासाठी जमिनी संपादन केल्या जातात. परंतु ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या जातात त्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैशाची तरतूद नसते आणि यातूनच विकसन अधिकारांचे हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स याची कल्पना उदयास आली. म्हणजे जमीन मालकांकडून जमीन ताब्यात घेण्याच्या किंवा त्याने जमिनीचे हक्क सोडण्याच्या मोबदल्यात, इतर कोणत्याही ठिकाणी जमीन विकसन करण्यासाठी विकसनाचे अधिकार देण्यात येतात आणि अशा पद्धतीने देण्याघेण्याचा व्यवहार केला जातो.जमिनीला अनेक प्रकारचे हक्क जोडले गेलेले असतात. उदाहरणार्थ, राईट टू ऑक्युपाय, राईट टू लेट आउट, राईट टू लिज, राईट टू ईजमेंट, राईट टू सेल, राईट टू  मॉरगेज आणि राईट टू डेव्हलप की जो आजचा आपला अभ्यासाचा विषय आहे. २) टी डी आर विरुद्ध टी डी आर-सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे की ट्रान्सफरेबल डेव्हलप.......