मोटार वाहनांवरील आय टी सी
Kishor Lulla
जी एस टी प्रणाली लागू झाल्यापासून इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आय टी सी ही संकल्पना व्यवसायांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा सेवांवर भरलेला जी एस टी पुढील विक्रीवरील करातून वजा करता येतो, ही आय टी सी ची मुख्य संकल्पना आहे. त्यामुळे करावर पुन्हा कर टाळता येतो आणि व्यवसायाचा प्रत्यक्ष खर्च कमी होतो. मात्र, जी एस टी कायद्यात काही विशिष्ट बाबींमध्ये आय टी सी घेण्यावर थेट बंदी घालण्यात आलेली आहे. त्यापैकी जास्त गोंधळ आणि चुका होणारा विषय म्हणजे मोटार वाहनांवरील आय टी सी.
अनेक व्यापारी, व्यावसायिक आणि कंपन्या वाहन, व्यवसायासाठी वापरले जाते म्हणून आय टी सी घेतात.परंतु जी एस टी कायद्यातील कलम 17(5) हे Blocked Credit चे कलम असून, मोटार वाहनांबाबत या कलमात स्पष्ट परंतु तितक्याच गुंतागुंतीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. याच तरतुदी न समजल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोटिसा, मागणी आदेश आणि दंड आकारले जात आहेत.
जी एस टी कायद्यानुसार मोटार वाहनांवरील आय टी सीठरवताना प्रामुख्याने तीन गोष्टी तपासल्या जातात .......


