केलेल्या सुधारणांमुळे जीएसटी रिटर्न दाखल करणे सोपे होणार?
Vinayak Agashe
प्रास्ताविक :
अलीकडच्या काही काळापासून देशातील नामवंत अर्थतज्ञांकडून सध्या असलेले कराच्या दराचे टप्पे कमी करून, अस्तित्वात असलेला कायदा सोपा करून त्याचे पालन करणे सुलभ करावे, अश्या प्रकारचे प्रतिपादन केले जात होते. स्वातंत्र्य दिनानिम्मित केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील सामान्य माणसांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंवरील कराचे दर कमी करण्याचे संकेत दिले होते.
जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक :
या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेची ५६वी बैठक दिल्ली येथे ३ सप्टेंबर ला संपन्न झाली. या बैठकीत कराचे टप्पे कमी करून सध्याचा कायदा सोपा करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आवश्यक ती पाऊले उचलली गेली. प्रेस नोट काढून त्याला प्रसिद्धी देण्यात आली.
सुधारणांचा तपशील :
या प्रेस नोट चा आधार घेऊनच लिखाण केले आहे. लिखाण करतेवेळी संबंधित नोटिफिकेशन उपलब्ध नव्हती. असे असले तरी प्रेस नोट मध्ये सुधारणांची मांडणी अशी केली आहे की सामान्य वाचकालाही कळेल. परिशिष्ट I (Ann.......


