रिअल इस्टेट क्षेत्राला जीएसटी सवलतींचा लाभ – जी.एस.टी २.०
Kishor Lulla
हा लेख लिहिताना अजून अध्यादेश हातात आलेला नाही
हा लेख कायदेशीर वापरासाठी नाही. याचा फक्त संदर्भासाठी उपयोग करावा.
प्रस्तावना
भारतीय अर्थव्यवस्थेत स्थावर मिळकत क्षेत्राला नेहमीच महत्त्वाचे स्थान आहे. गृहबांधणी आणि व्यावसायिक मालमत्ता हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून सर्वसामान्यांच्या जगण्याशी थेट जोडलेले आहेत. घर खरेदी करणे हा प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचा जीवनातील मोठा टप्पा असतो. अलीकडेच २२ सप्टेंबर २०२५ पासून बांधकाम साहित्य व यंत्रसामग्रीवरील वस्तू आणि सेवा करांचे दर जी.एस.टी परिषदेकडून त्याच्या ५६ व्या बैठकीमध्ये कमी करण्यात आले आहेत. या सवलतींमुळे बांधकाम व्यावसायिकाच्या हातात कॅश फ्लो वाढणार आहे. बांधकाम खर्चात घट होणार असून भविष्यात घरांच्या आणि व्यावसायिक प्रॉपर्टीच्या किंमती ५% पर्यंत कमी होऊन अधिक परवडण्याजोग्या होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या ५, १२, १८ आणि २८% च्या चार स्लॅबऐवजी आता तीन मुख्य स्लॅब असतील:
५% (आवश्यक वस्तूंसाठी), १८% (सामान्य वस्तूंसाठी) आणि ४०% (ल.......