Skip to main content
GST Review April-2026

जी एस टी - पुढील काही वर्षे

Kishor Lulla
जागतिक संघर्ष आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) झपाट्याने येणाऱ्या बदलांमुळे व्यापारी जगतासमोर अभूतपूर्व आव्हाने उभी राहिली आहेत. जीएसटीच्या दृष्टिकोनातून पाहता ही परिस्थिती या करप्रणालीला अधिक मजबूत करण्याची मोठी संधी प्रदान करते, तरीही व्यापक आर्थिक दबावामुळे दीर्घकालीन आव्हानेही वाढतील असे माझे मत आहे, कारण भारतासारख्या अर्थव्यवस्थेला जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सहन करावा लागतो. जागतिक युद्धांची सद्यस्थिती आणि भविष्य- जगभरातील वर्तमान परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्द सतत तिसऱ्या वर्षात प्रवेश करूनही कोणत्याही शांततेच्या बोलण्यांना पूर्णविराम मिळाला आहे, कारण रशियन सैन्याने पूर्व भागात मजबूत पकड निर्माण केली असून, दोन्ही बाजूंमधील राजकीय हट्टीपणा कायम आहे. यामुळे हे युध्द आणखी वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. मध्य पूर्वेत इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्यापासून अधिक तीव्र झाला असून, होर्मुझ सामुद्रधुनीवरील हल्ल्यांमु.......