Skip to main content
GST Review February-2024

गिफ्ट व्हाउचरवरील जीएसटी

Kishor Lulla
वस्तू आणि सेवा कायद्याअंतर्गत प्रीपेड इन्स्टमेंट्स किंवा गिफ्ट व्हाउचर यावरील करदेयतेबाबत साशंकता होती म्हणजेच याच्यावर जीएसटी केव्हा लागेल आणि काय दराने लागेल याविषयी बरीच मत भिन्नता होती. नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाने कल्याणी ज्वेलर्सच्या केसमध्ये (W.P. 5130 of 2022 dt 27.11.2023) एपेलेट अॅडव्हान्स रुलिंगचा निर्णय फिरवून ग्राहकांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यामुळे बऱ्यापैकी असंधीग्धता दूर झाली. या निर्णयाप्रमाणे गिफ्ट व्हाउचर हे अॅक्शनेबल क्लेम असून त्याचा परिशिष्ट तीन मधील वस्तू किंवा सेवेचा पुरवठा यामध्ये समावेश होत नाही. ज्या दिवशी गिफ्ट व्हाउचर दिले जाते त्या दिवशी जीएसटी भरण्याकरिता पुरवठ्याची वेळ धरली जाणार नाही तर या गिफ्ट व्हाउचरच्या साहाय्याने ज्यावेळी प्रत्यक्ष व्यवहार होतो ती पुरवठ्याची वेळ धरली जाईल. म्हणजेच त्यावेळी जीएसटी भरावा लागेल. ज्यावेळी गिफ्ट व्हाउचर प्रथमतः दिले जाते आणि त्यामध्ये नेमक्या वस्तू किंवा सेवेचा उल्लेख असतो आणि त्यासाठीची रक्कमही दिलेली असते, त्याचवेळी जीएसटी भरावा लागतो. परंतु गिफ्ट व्हाउचर मध्ये नेमक्या वस्तू आणि सेवेचा उल्लेख नसेल आणि .......