Skip to main content
GST Review January-2026

फिक्स डिपॉझिट वरील व्याज - जीएसटी

Amit Lulla
आजच्या काळात अनेक व्यापारी, व्यावसायिक तसेच नोंदणीकृत करदाते आपली अतिरिक्त रक्कम बँकेत ठेवतात आणि त्या ठेवींवर त्यांना नियमितपणे व्याज मिळते. या व्याजाच्या उत्पन्नाबाबत वस्तू व सेवा कराच्या रिटर्नमध्ये नोंद करावी लागते का, हा प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतो. विशेषतः लेखापरीक्षण, वार्षिक विवरणपत्र किंवा विभागीय चौकशीच्या वेळी या विषयावर संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाचा वस्तू व सेवा कराशी नेमका काय संबंध आहे, हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. वस्तू व सेवा कर हा केवळ वस्तूंच्या किंवा सेवांच्या पुरवठ्यावर लागू होणारा कर आहे. एखादी व्यक्ती किंवा संस्था जेव्हा वस्तू विकते किंवा सेवा पुरवते, तेव्हाच त्या व्यवहारावर हा कर लागू होतो. पैशांवर मिळणारे व्याज हे कोणत्याही प्रकारची वस्तू विक्री किंवा सेवा पुरवठा मानले जात नाही. बँकेत ठेवलेली रक्कम ही ग्राहकाची गुंतवणूक असते आणि त्या बदल्यात बँक जे व्याज देते, ते उत्पन्नाच्या स्वरूपात येते, पुरवठ्याच्या स्वरूपात नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूट अधिसूचनेनुसार बँक ठेवी, कर्ज किंवा आगाऊ रक.......