Skip to main content
GST Review January-2026

जीएसटी पोस्ट सेल डिस्काऊंट बाबत शासनाकडून स्पष्टीकरण

Vinayak Agashe
विषयाची ओळख जीएसटी कायद्याखाली वस्तूच्या विक्रीवर किंवा दिलेल्या सेवेवर हा कर आकारला जात असतो.पण कोणत्या किंमतीवर? त्याचे उत्तर कलम १५ मध्ये दिले आहे. ग्राहकाला जे बिल दिले जाते त्यामध्ये वस्तूची किंमत दर्शवलेली असते. त्या किंमतीवर सामान्यतः काही अपवाद वगळता जीएसटी आकारला जातो. पण ह्या किंमतीत डिस्काऊंट चा समावेश असल्यास त्यावर हा कर आकारला जात नाही. याचे ठळक उदारहण म्हणजे ट्रेड डिस्काऊंट. ही रक्कम मालाच्या मूळ किंमतीतून वजा केली जाते. राहिलेल्या किंमतीवर कर आकारला जात असतो. अश्याच प्रकारातील दुसरे उदारहण म्हणजे पोस्ट सेल डिस्काउंट. या प्रकारात बिलातून डिस्काउंटची रक्कम तात्काळ वजा न करता मान्य झालेल्या अटींचे पालन झाल्यावरच ह्याची वाजावट दिली जाते म्हणजेच केव्हा त्यावरच हा लेख आधारित आहे. कारण अलीकडच्या काही महिन्यापासून पोस्ट सेल डिस्काऊंटच्या विषयावर घडणाऱ्या घटना वाचनात येत होत्या. व्यापार आणि उद्योग क्षेत्राचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोका कोला कंपनीने ह्याच विषयच्या संबंधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेले रिट पिटीशन त्याबद्दल देखील वाचनात .......