Skip to main content
GST Review January-2026

देशी-विदेशी सहलींवर जीएसटी : कायदेशीर वास्तव

Kishor Lulla
अलीकडच्या काळात, विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा आर्थिक वर्ष संपताना, अनेक मोठ्या उत्पादक कंपन्या व पुरवठादार आपल्या विक्रेत्यांना, वितरकांना व व्यापाऱ्यांना व्यवसायिक उद्दिष्टे पूर्ण केल्याबद्दल मोफत किंवा सवलतीच्या दरात सहली देताना दिसतात. या सहली देशांतर्गत असू शकतात किंवा परदेशातीलही असू शकतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी, मोबाईल व मोबाईल अॅक्सेसरीज विक्रेते, सिमेंट व स्टीलचे व्यापारी, विद्युत उपकरणांचे डीलर्स, हार्डवेअर व्यापारी, बांधकाम साहित्य पुरवठादार, तसेच विविध सेवा क्षेत्रातील व्यावसायिक यांना अशा सहली मोठ्या प्रमाणावर दिल्या जातात. अनेक वेळा या सहलींना “प्रोत्साहन योजना”, “व्यावसायिक सन्मान दौरा”, “डीलर परिषद” किंवा “ओळख दौरा” अशी आकर्षक नावे दिली जातात.प्रत्यक्षात मात्र, या सहली कोणत्याही वैयक्तिक भेटवस्तू नसून, त्या व्यवसायाशी थेट संबंधित लाभ असतात. कारण, या सहली मिळण्यामागे एकच अट असते – ठराविक विक्री उद्दिष्टे पूर्ण करणे. सामान्यतः अशा सहलींचा खर्च विमानप्रवास, हॉटेल, भोजन, स्थानिक प्रवास, पर्य.......