Skip to main content
GST Review July-2025

जीएसटी – जर १२% नाही, तर किती?

Kishor Lulla
१) नुकत्याच आलेल्या बातमीप्रमाणे जीएसटी परिषद लवकरच वस्तू व सेवा करांचे दरसुसूत्रीकरणासाठी पावले उचलण्याची शक्यता आहे. याला उशिरा सुचलेले शहाणपण असे म्हणता येईल. सध्या अस्तित्वात असलेले १२% करांचे स्लॅब काढून टाकण्याचा विचार केला जात असून, चार स्लॅबऐवजी तीन स्लॅब ठेवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. २)सध्या जीएसटी प्रणालीत इतर स्लॅब व्यतिरिक्त खालील चार मुख्य कर स्लॅब आहेत. ५ % १२ % १८ % २८ % जीएसटी परिषदेने असा निष्कर्ष काढला आहे की १२% स्लॅब आजच्या घडीला फारसा प्रासंगिक नाही. तसेच एकच वस्तू दोन स्लॅबमध्ये असायच्या शक्यतेमुळे अँडव्हान्स रुलिंगची संख्या वाढत आहे, वादविवाद वाढत आहेत,बाजारात अस्थिरता निर्माण होत आहे. त्यामुळे या स्लॅबमधील वस्तू व सेवा ५% किंवा १८% या इतर दोन श्रेणींमध्ये हलवण्याचा विचार आहे. यासाठी या बदलाला केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, तज्ज्ञ, तसेच मंत्रीगटाचे सदस्य यांच्याकडून समर्थन मिळत आहे. ३) १२% स्लॅबमध्ये सध्या कोणत्या वस्तू आणि सेवा आहेत.......