देशाच्या आर्थिक पातळीवरील शांतीपूर्ण क्रांती - वस्तू आणि सेवा कर
Vinayak Agashe
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक स्तरावर व्यापाराचे झालेले जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा प्रसार याचे वारे वाहू लागले होते. याला करक्षेत्र देखील मागे राहिले नव्हते. फ्रान्स सारख्या देशाने व्हॅट सारख्या नव्या कर प्रणालीचा स्वीकार करून इतर देशापुढे एक नवा पर्याय ठेवला. आपल्या देशाने इथेच न थांबता व्हॅटचे पुढचे पाऊल म्हणजेच जीएसटी कायदा अंमलात आणला. त्याला आज ८ वर्षे पूर्ण झाली असून तो यशस्वीरित्या राबवला जात आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास देखील जीएसटीचा सिंहाचा वाटा आहे. ज्या उद्देशाने हा कायदा अंमलात आणला गेला तो उद्देशदेखील साध्य झालेला आहे. गेल्या काही वर्षापासून अपेक्षेपेक्षा अधिक महसूल गोळा होत आहे. देशपातळीवर एकच कायदा असल्याने आंतरराज्य व्यवहार करणे सोपे झाले आहे. केवळ उत्पादकावरच कराचे ओझे न टाकता विक्रीच्या साखळीतील प्रत्येक टप्प्यावर वाढीव किंमतीवरच हा कर आकारला जात असल्याने क राचे ओझे विभागले जात आहे. उत्पादकावरच कराचे सर्व ओझे न पडल्याने जागतिक स्तरावर असणाऱ्या स्पर्धेला देखील येथील उद्योजकांना स्पर्धेला सामोरे जाणे शक्य झाले आहे. स्पर्धेच्या या युगात जो सक्ष.......