युनिट कंटेनर, ब्रँड नेम आणि रजिस्टरड ब्रँड नेम
Amit Lulla
युनिट कंटेनर म्हणजे असे पॅकेजिंग की जे ठराविक प्रमाण किंवा निश्चित संख्येत माल ठेवण्यासाठी बनवलेले असते; यामध्ये टिन, डबा, काचेची बाटली, पिशवी, कार्डबोर्डची पेटी, ड्रम, बेरल यांचा समावेश होतो. अशा पॅकेजवर त्यातील प्रमाणाची Quantity स्पष्ट नोंद असणे आवश्यक आहे, म्हणजे ग्राहकाला किती प्रमाण मिळणार आहे हे सहज कळते, बाजारात पारदर्शकता राखली जाते आणि फसवणुकीपासून संरक्षण प्राप्त होते.
ब्रँड नेम म्हणजे एखादे नाव किंवा चिन्ह — जसे नाव, प्रतीक (symbol), मोनोग्राम, लेबल, स्वाक्षरी किंवा नव्याने बनवलेले शब्द की जे उत्पादनाच्या स्रोताची ओळख दाखवण्यासाठी व्यापारात वापरले जाते. हे चिन्ह ग्राहकाला वस्तूचा निर्माता किंवा विक्रेता ओळखण्यास मदत करते आणि ते बाजारातील विश्वासार्हता टिकवण्यासाठी गरजेचे असते.
रजिस्टरड ब्रँड नेम या संकल्पनेत १५ मे २०१७ ही निर्णायक तारीख आहे: ट्रेड मार्क अॅक्ट, 1999, कॉपीराइट अॅक्ट, 1957 किंवा परदेशातील लागू कायद्यांनुसार त्या तारखेपर्यंत नोंदणीकृत असलेले ब्रँड्स रजिस्टरर्ड मानले जातात आणि त्या नों.......


