Skip to main content
GST Review June-2026

कलम 169 जीएसटीमधील एक संवेदनशील वाद

Kishor Lulla
जीएसटी व्यवस्थेमध्ये कारणे दाखवा नोटीस, अंतिम आदेश, समन्स किंवा अन्य कोणतेही महत्त्वाचे कम्युनिकेशन करदात्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचवायचे याबाबत कलम 169 ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. या कलमाचा हेतू केवळ प्रशासनाची औपचारिकता पूर्ण करणे हा नाही, तर संबंधित करदात्याला त्याच्याविरुद्धची कारवाई समजून घेण्याची आणि त्यावर म्हणणे मांडण्याची वास्तविक आणि अर्थपूर्ण संधी देणे हा आहे. करप्रशासनाच्या डिजिटलायझेशनमुळे पोर्टल, ई-मेल आणि इलेक्ट्रॉनिक सेवा यांना अधिक महत्त्व आले असले तरी, न्यायालयांनी सातत्याने हे अधोरेखित केले आहे की सेवा ही केवळ “अपलोड” पुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्ष “communication” ठरली पाहिजे, म्हणजेच संबंधित व्यक्तीपर्यंत माहिती प्रभावीपणे पोहोचली पाहिजे. कलम 169(1) मध्ये सेवा करण्याचे विविध मार्ग दिले आहेत, जसे की प्रत्यक्ष देणे, नोंदणीकृत पोस्ट, स्पीड पोस्ट, ई-मेल, कॉमन पोर्टलवर उपलब्ध करणे, स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे किंवा शेवटच्या उपाय म्हणून फलकावर कागद चिकटवणे. या तरतुदीचा गाभा असा आहे की कम्युनिकेशन करण्यासाठी एकापेक्षा जास्त मा.......